Saturday, 11 July 2015

टु किल अ मॉकिंगबर्ड

आज हार्पर लीच्या पुलित्झर पुरस्कृत टु किल अ मॉकिंगबर्ड ला पंचावन्न वर्ष पूर्ण झाली. ११ जुलै १९६० साली हे पुस्तक प्रकाशित झाले आणि लाखो प्रत ह्या पुस्तकाच्या चटकन विकल्या गेल्या, इतक्या वर्षात कधीही आऊट ऑफ प्रिंट हे झाले नाही. तेव्हापासून अनेकांना ह्या पुस्तकाने वेड लावले, अनेकांच्या संग्रही झाले हे. हे पुस्तक बर्‍याजणींनी वाचले असेल, ह्यावर आलेला चित्रपटही बघितला असेल, तरीही आज ह्याबद्दल लिहावेसे वाटले म्हणून हा लेख.

ह्या गोष्टीची सुत्रधार स्काऊट फिंच जी कथेची नायिका आहे ती कथेचं वर्णन करते. स्काऊट स्वतः एक टॉम-बॉय सारखी आहे, तिला मुलांसोबतचं खेळायला आवडत, अगदी मारामारी करताना ही ती बुक्के मारायला मागे-पुढे बघत नसे. ही गोष्ट अ‍ॅलाबॅमाच्या छोट्या गावाची मेकाँबमधली आहे. १९३० चा Depression / मंदीचा काळ ह्यात दाखवलाय व कथानक तीन वर्षाच्या कालवधीत पुढे सरकतं . ह्यातील मुख्य पात्रे आहेत अ‍ॅटिकस फिंच, त्याची दोन मुलं - मुलगा जेम फिंच आणि मुलगी स्काऊट फिंच. अ‍ॅटिकस हा व्यवसायाने एक प्रतिष्ठित, उदारमतवादी, प्रामाणिक वकिल असतो. कथेत अजून एका पात्राचा उल्लेख आहे तो म्हणजे डिलचा. डिल हा उन्हाळ्याच्या सुट्टीत अपल्या नातेवाईकांकडे रहायला येतो जे फिंच कुटुबीयांच्या शेजारी राहतात. डिल, स्काऊट व जेम असे तिघे एकत्र खेळत असतात, त्यांना उत्सुकता असते आर्थुर रॅडली म्हणजे बु नामक इसमाची जो त्यांच्याच परिसरात राहतो पण कधीच घराबाहेर पडत नाही. बुबद्दल त्यांना माहिती करुन घ्यायची असते त्यामुळे ते अनेक शकला लढवत त्याच्या घरापाशी घुटमळत राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांनी बुसाठी लिहिलेया चिठ्ठ्या रॅडली हाउसपाशी नेऊन ठेवतात पण त्यांना कधीच त्या चिठ्ठ्यांना उत्तर मिळालेले नसते. उत्सुकतेपोटी हे तिघे हळुच कुणाच्याही नकळत रॅडली हाउसच्या खिडकीतून आत, घरात डोकवत राहतात. एकदा अ‍ॅटिकसने त्यांना ह्यासाठी दम ही भरला होता.

एके रात्री हे त्रिकूट असेच खिडकितून आत डोकावत असताना, कसल्याश्या संश्स्यास्पद हालचालीं बुच्या भावाला, नेथनला जाणवतात व तो संरक्षण म्हणुन बंदुकीची गोळी झाडतो. ह्या गोंधळामुळे मुले बिथरून पळून जातात. रॅडली हाऊसजवळचं एक झाड असतं ज्याच्या ढोलीत ह्या मुलांना नेहमी अनेक वस्तू सापडत असतात. त्या तिथे कोण आणून ठेवतं हे जाणून घ्याची उत्सुकता मुलांना लगलेली असते. कधी कोरीव काम केलेल्या साबणाच्या बाहुल्या, कधी पैसे, कधी च्युईंग गम, कधी तुटके घड्याळ तर कधी काही भेटवस्तू. एके दिवशी मुलं त्या ढोलीत बुसाठी चिठ्ठी ठेवायला जातात तेव्हा ती ढोली बुच्या भावाने बंद करुन टाकलेली दिसते.

इथे अ‍ॅटिकस एका कृष्णवर्णिय इसमाची, टॉम रॉबिंसनची केस हातात घेतो. टॉम ह्याला मेयाला यीवॉल ह्या गरिब, गोर्‍या मुलिवर बलात्कार आणि मारहाण केल्यामुळे अटक झाली होती. आटिकसने टॉमची केस हातात घेतल्यामुळे त्याच्या परिवाराला अनेक कठिण प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. स्काऊट आणि जेमला लोकांची जातीयसंबधी अनेक बोलणी, टोमणे खावे लागत असे. अ‍ॅटिकसच्या परिवाराला कडक टिका, अपमान, सहन करावे लागत असे. स्काऊटला तर इतर मुलांसोबत हातापायी, मारामारी करताना, स्वतःला आवरणे कठिण जात असे. जशी केसची तारीख जवळ येत होती तशी अ‍ॅटिकसची बहीण अ‍ॅलेक्झांड्रा फिंच कुटुबीयांसोबत रहायला आली होती. ती स्काऊटला तिच्या मनाविरुद्ध मुलींसारखे वागायचे कसे, वावरायचे कसे शिकवू पाही.
कोर्टात ट्रायलच्या आदल्या रात्री आरोपी टॉमला काऊंटी जेलमध्ये हलवले गेले होते. त्याला कुणी बेकायदेशीरपणे मारहाण करु नये म्हणून अ‍ॅटिकस रात्रभर टॉमच्या जेलबाहेर पाहारा देत उभा होता. जेम, स्काऊट आणि डिल हे रात्रभर अ‍ॅटिकसला काळजीने शोधत फिरत होते. काही माणसांचा घोळका अ‍ॅटिकसला धमकी देण्यासाठी तेथे आला असता तिन्ही मुलांच्या नजरेस ते दृश्य पडले. जेव्हा गोष्टी हाताबाहेर जाऊ लागल्या तेव्हा स्काऊट घाबरुन, आपल्या वडिलांच्या सरंक्षणासाठी धावत त्या घोळक्यापाशी गेली आणि बोलू लागली. त्या घोळक्यात तिच्या वर्गमैत्रिणीचे वडिलदेखील होते. तिचा निष्पापणा, भाबडेपण पाहून त्या घोळक्यांनी आवरते घेतेल वा ते निघून गेले.

ट्रायलच्या दिवशी कोर्टात अ‍ॅटिकसने मुलांना येण्यास मनाई केलेली असते तरीही मुलं कुतुहलामुळे कोर्टात येतात व तेथे असलेल्या बाल्कनीत बसतात. अ‍ॅटिकस टॉमची बाजू मांडत असतो, टॉमच्या म्हणण्यानुसार मेयालाने त्याला घरी बोलावून त्याचाशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचवेळी मेयालेचे वडिल बॉब यीवॉल हा इसम आला, त्याने मेयाला टॉमसोबत जवळीक साधताना पाहिले आणि त्याने चिडून तिला मारहाण केली. बर्‍याच विचारविनिमयानंतर कोर्टाने टॉमलाच दोषी करार केले , ही संपूर्ण घटना तिन्ही मुलं बसून बघत होते. त्यांना वाटले होते की टॉमची निर्दोष सुटका होईल पण कोर्टाने निकाल यीवॉल कुटंंबाच्या बाजून लावला, ह्यामुळे जेम हादरला होता, त्याच्या तर्कशक्तीचा विश्वासघात झाल्यासारखे त्यास वाटू लागले. इथे अ‍ॅटिकसला अपीलची आशा होती पण टॉम जेलमधून पळाला होता आणि ह्याच दर्म्यान गोळी लागून तो मरण पावला होता.

इथे मेयालच्या वडिलांची बॉबची कोर्टात नाचक्की झाल्यामुळे , अपमानित वाटल्यामुळे त्याला अ‍ॅटीकसचा व कोर्टातील इतर कर्मचार्‍यांचा राग आला होता, त्यांने अ‍ॅटिकसवर सूड उगवायचे ठरवले, जजच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता . रागाच्या भरात त्याने हॅलोवीनच्या रात्री अ‍ॅटिकसच्या मुलांवर - जेम आणि स्काऊटवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, ह्या झटापटीत जेमचा एक हात दुखावला गेला, स्काऊटला काहीच कळत नव्हते काय सुरु आहे ते, ती पार गोंधळून गेली होती, इतक्यात.....

त्या घातक रात्री स्काऊट आणि जेमच्या मदतीला कोण आले? त्यांचा जीव कुणी वाचवला? बॉबला पकडले गेले का? त्याच्या बाबतीत पुढे काय झाले? हे पुस्तकातच वाचण्यासारखे आहे.

ह्या पुस्तकात विनोद आहे, शोकांतिका आहे, एका लहान मुलीच्या नजरेतून जातीभेद, पूर्वग्रह हे उत्तमरित्या दर्शवले आहे. ह्यात जातीय असमानता दाखवली असली तरी सगऴ्यांनी पुन्हा-पुन्हा वाचावे असे हे प्रेरणादायी, प्रेमळ, उद्बोधक, मनोहारी, सुंदररित्या लिहिलेले पुस्तक आहे - ट्रअली अ टाईमलेस क्लासिक.

येत्या १४ जुलैला ह्या पुस्तकाचा दुसरा भाग गो सेट अ वॉचमन प्रकाशित होत आहे. ह्या पुस्तकात आता स्काऊट फिंच ही २० वर्षांनंतर आपल्या वडिलांना भेटायला न्युयॉर्कवरुन अ‍ॅलाबॅमाला येते.... आता हे नवं पुस्तक वाचण्याचा आपण सर्वांनीच आस्वाद घेऊया आणु जाणून घेऊया पुढे काय आहे ते  :)

Tuesday, 28 April 2015

ब्लॅक ब्युटी


पुस्तकाचे कथानक एका घोड्यावर आहे. एकोणीसाव्या शतकातील इंग्लंड मधला काळ ह्यात रंगवलाय. ही एका बोलक्या घोड्याची आत्मकथा आहे. लेखिका ॅना स्युवलने १८७७ ह्या काळात ही कथा एका घोड्याच्या दृष्टिकोनातून लिहिली आहे. ह्यात त्याचे बालपण, त्याला भेटलेले मालक, इतर पोनी, घोडे ह्यांच्याबद्दल वाचायला मिळते

कुराणात सहा शिंगरु होते त्यातले लहान शिंगरु म्ह्णजे ब्लॅक ब्युटी. ब्लॅक ब्युटी हे आपल्या आईसोबतच ग्रे नावाच्या शेतकर्याच्या शेतावर राहत असे, त्यानेच त्याला हे नाव दिले. त्याच्या आईचे नाव डचेस पण बर्याच वेळेला ग्रे तिला पेट म्हणून हाक मारे. ग्रे शेतकरी खूप चांगला, प्रेमळ होता. तो घोड्यांची चांगली निगा राखायचा. ब्लॅक ब्युटीला ब्लॅकी म्हणून हाक मारत असे. ड्चेस नेहमी त्याला चार छान गोष्टी समजावून सांगायची, भरपूर मेहनत करावी, सर्वांसोबत चांगले वागावे म्हणजे लोकं तुला भरभरून प्रेम देतील. ब्लॅक ब्युटी नेहमीच आपल्या आईचे म्हणणे ऐकत असे.
 

ब्लॅक ब्युटीचे शरीर / त्वचा छान गडद काळी, मऊसूत, चमकदार होती म्हणू ग्रेनं त्याला ब्लॅक ब्युटी नाव दिले. त्याचं एक पाऊल पांढर्या रंगाचे होते आणि कपाळावर पांढर्या रंगाची चांदणीसदृष्य आकार होता. ग्रे शेतकरी त्याला खोगीर आणि लगाम घालणे, ते कसे ताब्यात ठेवायचे हे शिकवत असे. आपल्या पाठीवर घोडेस्वाराला कसे स्वार होऊ द्यावे, घोडा-गाडी कशी ओढायची ह्याचे प्रशिक्षण देई. ब्लॅक ब्युटीला ओट्स खायला खूप आवडायचे. ग्रे शेतकरीने त्याला अगदी छान तयार केले होते. जेव्हा तो चार वर्षांंचा झाला तेव्हा त्याने त्याला स्क्वियर गॉर्डनला विकले. स्क्वियर गॉर्डन हा बर्टविक पार्कला राहत असे.
 

आयुष्याचे पुढिल काही वर्ष ब्लॅक ब्युटीचे वास्तव्य बर्टविक पार्कलाच होते. येथे ब्लॅक ब्युटीची मैत्री आण्खीन तीन पोनींरोबर झाली मेरीलेग्स, जिंजर आणि सर ऑलिव्हर. स्क्वियर गॉर्डन आणि घोड्यांची देखभाल करणारे त्यांचे दोन सहायक जॉन आणि जेम्स अतिशय प्रेमळ होते. ते त्यांची नीट निगा राखत. दर रविवारी सगळ्या पोनी, घोड्यांना काहे वेळ शेतावर फिरायला सोडत असे तेव्हा जिंजरकडून ब्लॅक ब्युटीला समजले की ती जरा तापट स्वभावाची आहे, ती सगळ्यांना आधी लाथा मारत असे, चावत असे त्यामागचे कारण म्हणजे तिच्या आधीच्या मालकांनी तिचे खूप हाल केले होते आणि तिला ह्याची प्रचंड चीड होती. सर ऑलिव्हरची शेपटी आखूड, कापलेली होती मेरीलेग्स गुटगुटीत , करड्या रंगाची पोनी, दाट आयाळ (Mane) असलेली, सुबक गॉर्ड्नच्या मुलांची आवडती होती. ह्यांची छान गट्टी जमली होती.
 

गॉर्ड्नला काही कामानिमित्त बाहेरगावी जावे लागणार होते. प्रवासात वाटेत अचानक हवामान बदलले, वादळी वातावरणात प्रवास करणं कठिण होऊ लागलं. रात्र खूप झाली होती, एका नदीजवळ येताच पूल पार करून जावे लागणार होते पण ब्लॅक ब्युटी काही केल्या पुढे जाईना, शेवटी पुलाचा जो रखवालदार होता त्याने दिवटी लावून बघितले तेव्हा समजले की पुल मधुन कोसळला होता. गॉर्ड्न ब्लॅक ब्युटीवर खुष झाला त्याचे प्राण वाचवल्याबद्दल त्याने आभार व्यक्त केले, हे ऐकून ब्लॅक ब्युटीला खूप आनंद झाला स्वतःचा अभिमान वाटु लागला.
 

एके दिवशी स्क्वियर दाम्पत्य ह्यांना मित्रांकडे जायचे होते म्हणून जेम्सने जिंजर ब्लॅक ब्युटीला गाडीला बांधले चालवू लागला. तसा लांबचा प्रवास होता म्हणून रात्री एका ठिकाणी थांबायचे ठरविले. जेम्सने ब्लॅक ब्युटी जिंजरला एका तबेल्यात बांधले. एका गाफील वाट्याड्याने सिगारचा पाईप त्या तबेल्यात भिरकावून दिला त्यामुळे तबेल्याला आग लागली. जेम्सने त्या दोघांचे प्राण वाचवले. स्क्वियर दाम्पत्य आपल्या मोतद्दारावर खूप खूष झाले पण जिंजर ब्लॅक ब्युटी ह्या सगळ्या प्रकरणात घाबरुन, दमून गेले होते.त्यांना आरमाची गरज होती.
 

काही काळाने जेम्स दुसर्या शहरात कामानिमित्त निघून गेला, त्याच्या जागी चौदा वर्षीय जोई कामावर रुजु झाला. जोई तसा नवीनच होता पण त्याची शिकण्याची तयारी होती. एका रात्री जॉन रडत-रडत तबेल्याजवळा आला, सौ.स्क्वियर ह्यांची तब्येत बिघडली होती आणि डॉक्टरांना लवकरात लवकर बोलावून आणावे लागणार होते. जॉन ब्लॅक ब्युटीवर स्वार होऊन जोर-जोरात पळवू लागला, डॉक्टरांचा घोडा आजारी असल्यामुळे डॉक्टर स्वतः ब्लॅक ब्युटीवर स्वार होऊन गॉर्डन स्क्वियरच्या घरी पोहोचले आणि जॉन पायी यायला निघाला. ब्लॅक ब्युटी घरी येताच जोई त्याला घेऊन तबेल्यात आला, ब्लॅक ब्युटीची तब्येत खराब होऊ लागली, जोईला कळेना काय करावे त्याने ब्लॅक ब्युटीचे पाय चोळुन दिले, वैरण, मका खाऊ घातले तरीही ब्लॅक ब्युटी थरथरत होता. इतक्यात जॉन तेथे पोहोचला त्याने ब्लॅक ब्युटीच्या अंगावर - घोंगड्या घातल्या. ब्लॅक ब्युटीचा जीव जॉनने वाचवला होता.
 

काही दिवसांनी सौ.स्क्वियरना हवाबदल म्हणून दुसर्या शहरात गॉर्डन घेऊन गेले. जायच्या आधी त्यांनी ब्लॅक ब्युटी जिंजरला लॉर्ड वेस्टर्लेगला विकण्यात आले. बर्टविक पार्क सोडून त्यांना आता अर्लशॉल पार्कला यावे लागले रहायला. लेडी वेस्टर्लेग ही खूपचं दुष्ट बाई होती. ती नेहमी ब्लॅक ब्युटीला लगाम घालून ठेवायची म्हणजे त्यांचे डोके सदा वर राहिल, असे केल्याने आपली शान वाढते असे तिला वाटे पण ब्लॅक ब्युटीला ह्याचा खूप त्रास होत, खूप दुखे.
 

त्यांचा मोतद्दार रुबेन स्मिथ हा मदयपी होता. एका रात्री मद्यपान करून तो ब्लॅक ब्युटीला घेऊन शहरात गेला , चाबकाचा वापर ही केला. एका लोहाराने रुबेनला सांगितले ही की ब्लॅक ब्युटीची नाल एका पायातून निघाली आहे पण त्याला त्याचे काहीच पडले नाही. तो चाबूक मारून अधिक जोराने ब्लॅक ब्युटीला दौडवू लागला. ब्लॅक ब्युटी पडला रुबेन त्यावरून खाली फेकला गेला जागीच मरण पावला. ब्लॅक ब्युटीच्या पायालाही ईजा झाली त्यमुळे लॉर्डने त्याला एका कॅब ड्राय्व्हर जेरेमी बार्करला विकले.

 

पुढे जेरी आणि ब्लॅक ब्युटीचा एकत्र सहवास कितपत राहतो, जेरी त्याला अजून कुणाला विकतो कि नाही विकत, ब्लॅक ब्युटीचा पुढिल प्रवास , जिंजरबद्द्ल अधिक माहिती, इतर घोड्यांबात माहिती हे सगळे पुस्तकात वाचण्यासारखे आहे. प्रत्येक प्रकरणात छानसा संदेश दडला आहे.
 

मला आवडलेले बरेच कोट्स आहेत पण हे त्यातले एक जे सर्वात जास्तं आवडले "“if we could act a little more according to common sense, and a good deal less according to fashion, we should find many things work easier".
 

जरुर वाचा एक घोड्याची छानशी गोष्ट.
 
 
 
 
 
*छायाचित्र आंजावरून साभार